मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 4 मार्च 2021 (17:57 IST)

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नवीन माहिती आली समोर

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुरावे असलेला पूजाचा लॅपटॉप भाजपच्या नगरसेवकाकडे असल्याचा आरोप झाला होता. त्या आरोपानंतर आता भाजपचा स्थानिक नगरसेवक गायब झाल्याचं सांगितलं जात आहे. या नगरसेवकाचा 24 तासांपासून पत्ताच नाही अशी  माहिती समोर आली आहे. 
 
बुधवारपासून भाजपचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे घरी आले नसल्याचं त्यांच्या वडिलांनी माहिती दिली. तर माझ्या मुलाची बदनामी या प्रकरणात केली जात आहे. त्याने कोणताही लॅपटॉप चोरला नाही अशी माहिती धनराज घोगरे यांचे वडील बाबुराव घोगरे यांनी दिली. 
 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी बीड मध्ये आणखीन एक तक्रार देण्यात आली. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडीचे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी पीडित पूजा चव्हाणसह बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण-राठोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.