शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (14:30 IST)

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्दा आजही अधिवेशनात गाजला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या प्रकरणी क्लीन चीट दिली आहे. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचं सांगते आणि पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली.
 
या प्रकरणी 6 अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. वसतीगृहातील 41 महिलांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं गृहमंत्री देशमुख म्हणाले. पोलिसांनी व्हिडीओ काढला यात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री म्हणाले.
 
तक्रार करणारी महिला वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचं गृहमंत्री म्हणाले.