शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (20:58 IST)

कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री : नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा 'कॉमेडी सम्राटा'चं भाषण असा उल्लेख नितेश राणे यांनी केला आहे. "आज एक 'कॉमेडी सम्राट' विधानसभेत पाहिला आणि ऐकला..महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! "कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री", असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच सुधीर मुनगंटीवर यांनी केलेल्या भाषणाची "नटसम्राट पाहातोय की काय" अशी टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेचा धागा पकडून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण 'कॉमेडी सम्राट' भाषण असल्याचं म्हटलंय.