शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (20:27 IST)

स्‍वाभिमानी पक्ष महागाईविरोधात राज्‍यव्‍यापी आंदोलन करणार

शेतकरी विरोधी धोरणाबरोबरच महागाईविरोधात राज्‍यव्‍यापी आंदोलन करण्‍याचा निर्णय स्‍वाभिमानी शेतकरी संघटना व स्‍वाभिमानी पक्षाने घेतला आहे. येत्‍या आठवड्यात कार्यकर्त्यांची व्‍यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्‍यात येईल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
ते म्‍हणाले, तुळजापूर येथे झालेल्‍या राज्‍य कार्यकारिणीच्‍या बैठकीत राज्‍यात संघटेनेचे जाळे अधिक व्‍यापक करण्‍यासाठी सभासद नोंदणी मोहीम सुरू केली आहे. शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नाबरोबरच आता स्‍वाभिमानी पक्षाच्‍या वतीने सर्वसामान्‍य जनतेच्‍या आणि शैक्षणिक प्रश्‍नावर आंदोलन करण्‍यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्‍या किंमती प्रचंड वाढल्‍या आहेत. ३० रुपयाला मिळणारे पेट्रोल शंभर रुपये होऊ घातले आहे. बाय प्रॉडक्‍ट असलेल्‍या गॅसच्‍या किंमती देखील प्रचंड वाढल्‍या आहेत. यात जनता होरपळत आहे. परंतू त्‍याचे कोणत्‍याच सरकारला काही देणे, घेणे दिसत नाही. वर्ष झाले शाळा सुरू नाहीत. त्‍यामुळे शिष्‍यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नाही. असे असताना शाळा, कॉलेज मात्र पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहेत असे सांगितले.