एमबीबीएसची परीक्षा ऑफलाईनच होणार
येत्या ८ मार्चपासून एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी एमबीबीएस परीक्षा ऑनलाईन घ्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील अनेक केंद्र आणि महाविदालय आहेत. ज्याठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा होणे शक्य नाही. त्यामुळे पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. अशा विद्यार्थ्यांची केंद्रावर आयसोलेशन रुमची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे.