शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 3 मार्च 2021 (15:51 IST)

राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली आहे : मुनगंटीवार

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. जळगाव वसतिगृह प्रकरणावरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याची टीका करताना आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचं म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत नवाब मलिक यांनी मुनगंटीवार धमकावत असल्याचा आरोप केला.
 
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत.