शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (22:35 IST)

काय म्हणता, दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 
 
विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय.