टोलनाक्यावर बनावट पावत्याच्या माध्यमातून उकळले करोडो रुपये, सात जण अटकेत
पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टाेलनाका आणेवाडी टाेलनाका याठिकाणी बनावट टाेल पावत्याद्वारे दाेन महिन्यापासून सुमारे दोन कोटी रूपये टोल वसुली करण्यात आल्याचे खेडशिवापूर टाेलनाक्यावर ऑडीट रिपाेर्ट दरम्यान 24 फेब्रुवारी राेजीच्या पाहणीत सुमारे दाेन हजार वाहने 24 तासाचे कालावधीत तीन लाख 80 हजार रुपयांचे बनावट पावती देवून साेडले असल्याचे दिसून आल्याची माहिती पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
खेड शिवापूर टाेलनाक्यावर बनावट पावत्या तयार करुन वाहन चालकांची फसवणुक केली जात असल्याची तक्रार अभिजीत बाबर यांनी पाेलिसांकडे केली हाेती. त्यानुसार पुणे ग्रामीण पाेलिसांचे पथकाने खेडशिवापूर टाेलनाका येथे खातरजमा केली असता, त्याठिकाणचे टाेल कर्मचारी शेवटच्या लेन मध्ये टाेलवसुलीची 190 रुपयांची बनावट पावती देऊन फसवणुक करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सुरेश प्रकाश गंगावणे (वय-25,रा.वाई, सातारा), अक्षय सणस (22,रा.वाई, सातारा), शुभम सिताराम डाेलारे (19,रा.जनता वसाहत,पुणे), साई सुतार (25,रा.कात्रज,पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे टाेलवसुलीच्या बनावट पावत्या हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्यांचे साथीदार हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे व इतर साथीदार यांचेवर टाेल नाक्यावर वाहनचालकांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे-सातारा टाेल राेड प्रा.लि. या कंपनीस टाेलची पावती देत असते, त्याचप्रमाणे बनावट पावती आराेपी लॅपटाॅपला प्रिंटर लावून पर्यायी साॅफ्टवेअरद्वारे पावती छापत असल्याचे चाैकशीत समाेर आले आहे. याप्रकरणी राजगड पाेलीस ठाऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय चव्हाण (19,रा.वाई, सातारा), संकेत गायकवाड (22,रा.जावळी, सातरा), अमाेल काेंडे (36,रा.खेडशिवापूर, पुणे) या आराेपींना ही अटक करण्यात आली आहे. अमाेल काेंडे या काॅन्ट्रक्टर साेबतच विकासआण्णा शिंदे (वा सातारा), मनाेज दळवी (भाेर,पुणे), सतीश मरगजे, हेमंत बाठे हे फरार झालेल्या काॅन्ट्रक्टरचा पाेलीस शाेध घेत आहे. संबंधित टाेल वसुलीचा पैसा सदर काॅन्ट्रक्टरचे खिशात जात हाेता ही बाब समाेर आली आहे.