नागपुरात फसवणुकीची नवी पद्धत, बनावट कागदपत्रांद्वारे74 लाखांचे गृहकर्ज घेतले
नागपुरात फसवणुकीचे नवीन प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तींने घरमालकाच्या मालमत्तेची रंगीत छायाप्रत कागदपत्रे एका वित्त कंपनीला देऊन आणि स्वतःचे घर असल्याचा दावा करून गहाण ठेवून वित्त कंपनीकडून 74 लाखांचे गृहकर्ज घेतल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण बेलतरोडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात आरोपीने एक नाही तर 3 गृहकर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींपैकी काहींनी या फायनान्स कंपनीत कर्जवसुली एजन्ट म्हणून काम केले आहे. त्यामुळे दोघांना गृहकर्जाची संपूर्ण माहिती होती. या दोघांनी गृहकर्ज घेऊन फसवणूक करण्याचा कट रचला होता.
ही फायनास कंपनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. तक्रारदार हे बेसारोड वरील शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. ही फायनान्स कंपनी मालमत्ता गहाण ठेवून गृहकर्ज देते. 26 ऑक्टोबर 2023 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान आरोपींनी तक्रारदाराच्या कंपनीतसोबत घर गहाण ठेवण्यासाठी कट रचला.
आरोपीने स्वतःचे घर गहाण ठेवण्यास कंपनीला सांगितले.घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याने गृहनिर्माण कंपनीकडून 74 लाखांचे गृहकर्ज घेतले.
सुरुवातीला आरोपीने त्यांच्या गृहकर्जाचे हफ्ते फेडले नंतर ते भरलेच नाही. शाखा व्यवस्थापकाने चौकशी केल्यावर त्यांना गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची रंगीत छायाप्रत जोडण्यात आल्याचे आढळले.
हफ्ते चुकल्यामुळे गृहनिर्माण कंपनीचे कर्मचारी गृहकर्ज घेण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर घरमालकाने आम्ही कोणतेही कर्ज घेतले नसून घर विकायला ठेवले आहे. खरेदीचा अंतिम करार देखील झाला आहे. हे ऐकतातच सर्व प्रकरण उघडकीस आले.
व्यवस्थापकाला आरोपीने मालमत्ता त्यांची भासवून कंपनीची फसवणूक करून गृहकर्ज घेतले. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकाने बेलतरोडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे आणि आरोपींनी अजून कुठे फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करत आहे.
Edited By - Priya Dixit