1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 मार्च 2025 (11:57 IST)

औरंगजेबाच्या कबर वादात एनआयएची एन्ट्री,संभाजी नगरसह मराठवाड्यातील 9 शहरांवर कडक नजर

NIA1
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेल्या वादाने नागपुरात हिंसाचाराचे रूप झाले. या प्रकरणात आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)ने प्रवेश केला आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यात देखील एनआयए तपास करत आहे. 
हिंदुत्ववादी संघटनांनी खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. या वरून नागपुरात हिंसाचार झाला. सध्या मराठवाड्यातील भागात या मुद्द्यावरून शांतता आहे. आता एनआयए संस्था सक्रिय झाली आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये एनआयए दाखल झाली आहे. 
एनआयए संस्था सर्वप्रथम खुलदाबाद औरंगजेबाच्या कबरीवर गेली आणि चौक्शी केली. नंतर पथक परभणी, जालना, नांदेड सारख्या भागात जाऊन तपासणी केली.
एनआयए प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मराठवाड्यातील 9 शहरांवर कडक नजर ठेवत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवले आहे. 
 
Edited By - Priya Dixit