Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निलंगा : औराद शहाजानीत ४२ अंश सेल्सिअस तापमान

Updated: बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:11 IST)
 
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढल्याने थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी असते व गर्मीच्या दिवसांत तापमानात वाढ होते. त्यातच गत ३ दिवसांपासून औराद शहाजानीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना गर्मीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यात वयोवृद्ध व लहान मुलांना अधिक झळा सोसाव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यातून सुटका मिळावी, यासाठी नागरिक दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेत आहेत.
 
तीन दिवसांपासून तापमान वाढ
गेल्या ३ दिवसांपासून औरादच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात ३१ डिसेंबर रोजी कमाल ४०.०५ तर किमान २६ अंश सेल्सिअस, १ एप्रिल रोजी कमाल ४१ अंश सेल्सिअस व किमान २६ .०५ आणि २ एप्रिल रोजी कमाल ४२ अंश सेल्सिअस व किमान २७.०५ अंश सेल्सिअस झाले असल्याचे औराद येथील हवामान केंद्राचे मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिक डोक्यावर टोप्या, गमच्या, छत्री आदींचा वापर करीत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

SBI ग्राहकांना महत्त्वाची सूचना जाहीर! वाचा

'वंदे मातरम'ऐवजी लता मंगेशकर यांचे गाणे वाजवल्याने एकनाथ शिंदे नाराज; संजय निरुपम यांची काँग्रेसवर टीका

LIVE: मुंबईतील 'बेस्ट'च्या ताफ्यात १५० नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस सामील होणार

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता! राज्य सरकारचा नवा प्रस्ताव

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका; कळंब नगरपरिषदेचे १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

पुढील लेख
Show comments