मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (11:01 IST)

“संज्याला प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”

sanjay raut
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत सर्व जण घरात कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि आपआपले छंद जोपासत आहे. 
 
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील हार्मोनिअम वाजत आपल्या छंदासाठी वेळ काढला आणि याच क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्म वर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली.”
 
यापूर्वीही अनेकदा निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते.