रविवार, 25 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (13:05 IST)

Nipah virus : महाराष्ट्रात निपाह व्हायरस आढळला

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्ववर येथील गुहेतील दोन वटवाघुळात निपाह विषाणू सापडला आहे. अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रग्या यादव यांना सांगितलं की, महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता. पण, मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एनआयएने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.
 
संपूर्ण जग अद्यापही कोरोना विषाणूच्या Corona Virus महामारीशी सामना करत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्राचाही Maharashtra समावेश होता. राज्यावरील दुसऱ्या लाटेचे संकट अजूनही कमी झालेले नसताना आता महाराष्ट्रातून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या National Institute of Virology, Pune शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात प्रथमच वटवाघळांमध्ये Bats निपाह विषाणू आढळून आला असल्याची माहिती दिली आहे. महाबळेश्वरमधील एका गुहेत मार्च 2020 मध्ये हे वटवाघूळ सापडले होते.
 
याबाबत संशोधन करणारे डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी संबंधित संशोधनाबाबत माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धोकसायक रोगांच्या यादीत निपाह विषाणूला पहिल्या 10 रोगांमध्ये स्थान आहे. निपाह खासकरून वघटवाघुळांमध्येच आढळतो. मात्र हा विषाणू जर मनुष्यापर्यंत पोहोचल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतात. केरळमध्ये 2018 मध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झाला होता. चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्रात यापूर्वी कधीही वटवाघळाच्या कोणत्याही प्रजातीत निपाहचे विषाणू आढळले नव्हते, आता राज्यातच हा विषाणू आढळून आल्यामुळे आता राज्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. मार्च 2020 मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेतून, वटवाघळाच्या दोन प्रजाती, रौसेट्स लेशेनॉल्टुली (मध्यम आकाराचे फळ खाणारे ) आणि पिपिस्ट्रेलस (लहान आकाराचे कीटक खाणारे), या दोन प्रजातीच्या वट वाघलांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.