शनिवार, 20 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (15:03 IST)

'घरी बसून एवढं काम केलं, बाहेर पडलो तर किती होईल'- उद्धव ठाकरे

I did so much work sitting at home
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात राहूनच काम केले अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात आली. याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मी घरातून कारभार करतो अशी टीका विरोधक करतात. मला त्यांना सांगायचे आहे की, घरातून एवढं काम होतंय, घराबाहेर पडलो तर किती होईल?"
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपण लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत असताना आपण मात्र बाहेर पडायचे हे मला पटत नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण मी लवकरच घराबाहेर पडणार आहे असंही ते म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केवळ विरोधकांना प्रत्युत्तर दिलं नाही तर सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टोले लगावले आहेत.
 
ते म्हणाले, "अनेकजण स्वबळाचा नारा देत असताना आपणही देऊ. पण न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. माझ्यासाठी स्वबळाचा हा अर्थ आहे. निवडणुका येतात आणि जातात. विजय-पराभव होत असतो. पण हरल्यानंतर पराभवाची मानसिकता घात करते." असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.