सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (20:50 IST)

शिवसेना राणे नावाला घाबरते, परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या - नितेश राणे

'राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत', असं आमदार नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना म्हटलंय.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मोर्चा संपल्यानंतर परत जाताना काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय.
 
दरम्यान शिवसेना भवन हे आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढायचा नाही, असं खासदार संजय राऊत यांनी भाजपला म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केलाय.
भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर नितेश राणे म्हणाले, "जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला.