शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (21:19 IST)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं नव्या सीबीआय संचालकांचं स्वागत; म्हणाले…

Deputy Chief Minister Ajit Pawar welcomes new CBI Director; Said
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने सोमवारी या पदासाठी सुबोधकुमार यांची निवड केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांचं स्वागत केलं आहे. “महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी सीबीआयच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्याची सीबीआय संचालकपदी झालेली निवड राज्याचा गौरव वाढवणारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!” असं अजित पवार म्हणाले आहेत.
 
सुबोधकुमार सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. सुबोधकुमार यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे. तेलगी प्रकरणापासून ते एल्गार परिषद, भीमा कोरेगाव, मालेगाव बॉम्बस्फोट अशी विविध प्रकरणे हाताळणारे सुबोधकुमार जयस्वाल आता केंद्रीय अन्वेषण विभागाचा कार्यभार हाताळणार आहेत. पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून राज्य सरकारशी वाद झाल्यानंतर जयस्वाल यांची केंद्रात नियुक्ती झाली होती.