सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 20 जून 2021 (13:06 IST)

डॉक्टरांना सात दिवसांची पोलीस कोठडी

कोरोना रुग्णावर बेजबाबदारपणे उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीनंतर सांगलीतील डॉ. महेश जाधव यांना अटक करण्यात आली.न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार केली.
 
याप्रकरणाची चौकशी केली असता रुग्णांच्या कागदपत्रांवरूनही हलगर्जी झाली असल्याचे उघड झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यासगळ्याला रुग्णालयाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचेही समोर आले. त्यामुळे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश जाधव यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.