रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (18:23 IST)

बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश

बारावीत विशिष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळणार आहे.यासाठी आतापर्यंत आवश्यक असलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे
या निर्णयामुळे निश्चित केलेले कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.तसंच या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षाही घेतली जाणार नाही.