सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 20 जून 2021 (14:58 IST)

'तुमच्या वाटेला शिवथाळी कधी येईल समजणारही नाही' नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला

भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, "कधी कोणाच्या कानशिलात लगावली नाही त्यांनी धमकीची भाषा करू नये. स्वत:ला सांभाळा, तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही.
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थित केला. शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर संजय राऊत यांनी शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे शिवथाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा भाजपला दिला होता.
नारायण राणे पुढे म्हणाले, "आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नसून ती जुन्या शिवसैनिकांचीही नाही. ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये."