1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (09:59 IST)

राज्यात सर्वाधिक थंड निफाड

महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील सर्वाधिक कमी असे तपमान निफाड येथे नोंदविले गेले असून सुमारे ९ डिग्री सेल्सिअस तपमान नोंदविले गेले आहे. महाराष्ट्रातील असलेल्या नाशिकमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. यामध्ये जर विचार केला तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तपमान कमी होण्यास सुरुवात झाली होती. तर सुरवातीला  १३ अंश सेल्सिअस ते आज नाशिक मध्ये १०.२ डिग्री सेल्सिअसचे तपमान नोंद झाली आहे. 
संपूर्ण राज्यात नेहमी प्रमाणे निफाड येथे तपमान कमी असते यावेळी सुद्धा तपमान कमी होत असून ९ डिग्री सेल्सिअस तपमान नोंदविले गेले आहे. मागच्या वर्षी निफाड येथे २ डिग्री तपमान होते. दिवाळी संपताच यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमानची नोंद झाली आहे. वातावरणातील हा गारवा दिवसभर जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे गारठलेल्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक देखील सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.