1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जून 2022 (08:05 IST)

नितेश राणेंचा नाशिकमध्ये प्रहार .. म्हणाले संजय राऊत `लोमटया`

nitesh rane
नाशिक : शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत सेफ मते संजय पवार यांना दिली पाहिजेत. कारण ते खरे शिवसैनिक आहेत. संजय राऊत हा तर लोमटया आहे. त्याला जादा मते दिली पाहिजेत. तो बाहेरून आलेला आहे. त्याच्यासाठी मुख्यमंत्री एव्हढी धावपळ का करीत आहेत?. असे शब्दप्रयोग करूत भाजपचे आमदार नितेश राणे मंगळवारी शिवसेनेवर घसरले.
 
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी कोणत्याही धार्मिक प्रतिकांची तसेच धर्माविषयी अपमानजनक कृत्य घडता कामा नये. असे करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात नाशिक येथे इन्स्टाग्रामवर प्रसारीत झालेल्या एका आपत्तीजनक चित्राबाबत देखील कडक कारवाई करून संबंधीताना अटक करावी, ही आमची मागणी आहे, असे सांगितले.
 
यावेळी त्यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात, आमचेच हिदुत्व खरे आहे. मग ते कोणत्याही विषयावर भूमिका का घेत नाहीत. ग्यानवापी मशिद, औरंगाबाद शहराचे नामांतर, औरंगजेब यांची कबर या विषयावर त्यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे. शिवसेना कधीही कोणत्याही विषयावर भूमिका घेत नाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
 
आमदार राणे यांच्या उपस्थितीत धार्मिक प्रतिकांची समाज माध्यमांवर विटंबणा झाल्याने छोटा मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे सहभागी झाले.