गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (15:44 IST)

हेल्मेट नाही तर लायसन्स रद्द!

नाशिककरांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. बहुतांश नाशिककरांकडून हेल्मेटचा नियमित वापरदेखील केला जात आहे. मात्र काही बेशिस्तांकडून अद्यापही हेल्मेट सक्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना वठणीवर आणण्याकरिता पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता दंडात्मक कारवाईचा आदेश दिला आहे. बेशिस्त दुचाकी चालकांना 22 डिसेंबर रोजीच अल्टिमेटम दिला होता आता मंगळवारपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
 
पहिल्यांदा 500 रुपये दंड तर दुसर्‍यांदा लायसन्स रद्द
वाहतूनक शाखेकडून नव्या सुधारित आदेशाप्रमाणे पोलिसांकडून विनाहेल्मेट प्रवास करणार्‍या बेशिस्त दुचाकी चालकांना 500 रुपयांना दंड केला जाणार आहे. एकदा दंड भरल्यानंतर सुद्धा दुसर्‍यांदा पुन्हा जर विना हेल्मेट दुचाकी चालविताना पोलिसांना आढळून आल्यास 1 हजार रुपयांचा दंड तर केला जाईल, मात्र त्यासोबत 3 महिन्यांकरिता लायसन्नस देखील रद्द केले जाणार आहे.