1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (15:48 IST)

मला कितीही त्रास द्या, मी सर्वांच्या उरावर बसेन : एकनाथ खडसे

eknath khadse
विरोधक रोज म्हणतात, कुछ ना कुछ होनेवाला है, मात्र कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उरा पे बैठने वाला हूँ.. मला कितीही त्रास द्या, मी सर्वांच्या उरावर बसेन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेत बोलताना खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीकास्त्र डागले आहे.
 
विरोधकांकडून सातत्याने छळ सुरु असून मला अडविण्यात येत आहे. काहींना काहीतरी खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आहे आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. पण जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे शिंदे फडणवीस सरकारला थेट आव्हान दिले आहे.माझा कितीही छळ केला मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या उरावर बसेन असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor