1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (15:40 IST)

काय म्हणता, मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट हॅक

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट अचानक हॅक झाले आहे. याबाबतची माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, याबाबत लवकरचं अधिक माहिती दिली जाईल, त्यानंतरच रेल्वे पोलिसांच्या ट्विटकडे लक्ष द्या. या प्रकरणी तपास सुरु असून, अकाऊंट लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
 
गेल्या काही दिवसांपासून देशात सायबर क्राईमच्या घटना वाढत आहेत. हॅकर्सकडून प्रसिद्ध व्यक्तींचे, संस्थांचे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट्स टार्गेट केले जात आहे. सायबर क्राईमच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor