मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जून 2022 (17:06 IST)

Cyber Attack on India:महाराष्ट्रातील 70 सह देशातील 500 वेबसाइटवर सायबर हल्ला

cyber halla
on India: मंगळवारी देशात मोठा सायबर हल्ला झाला. देशातील 500 हून अधिक वेबसाइट हॅक झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांच्या साइटसह 70 वेबसाइटचा समावेश आहे. यापैकी तीन सरकारी आहेत. या प्रकरणात मलेशिया आणि इंडोनेशियातील हॅकर्सवर संशय व्यक्त केला जात आहे. 
 
मधुकर पांडे, एडीजी, महाराष्ट्र सायबर सेल म्हणाले की, आम्ही अनेक वेबसाईट रिस्टोअर केल्या आहेत. अनेकांवर काम सुरू आहे. खासगी विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक केल्यानंतर राज्यातील 70 हून अधिक वेबसाइटवर हल्ला करण्यात आला. यापैकी तीन सरकारी होते. हॅक झालेल्या वेबसाइट्सची संख्या 500 पेक्षा जास्त आहे. 
 
एडीजी पांडे म्हणाले की, देशात सुरू असलेल्या जातीय तणावादरम्यान अनेक सायबर हॅकर्सनी मिळून हा हल्ला केला. देशात अनेक वेबसाइट हॅक झाल्या आहेत. या प्रकरणात मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशांतील हॅकर्सची नावे समोर येत आहेत. ही टोळी भारतात सक्रिय आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
 
ठाणे पोलिसांचे सायबर सेलचे डीसीपी सुनील लोखंडे यांनी सांगितले की, आज पहाटे 4 वाजता पोलिसांची वेबसाइट हॅक करण्यात आली. तांत्रिक तज्ञांनी डेटा आणि वेबसाइट रिस्टोअर केली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने राज्याच्या सायबर सेलला सरकारी वेबसाइट्स आणि इतरांच्या हॅकिंगची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याप्रकरणीही तपास सुरू करण्यात आला आहे.