सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:46 IST)

मुंबई-पुणे दरम्यान एकही रेल्वे गाडी धावलेली नाही

सध्या मुंबईला जाणाऱ्या डेक्कन, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी प्रगती एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या बंद आहेत. मंकी हिल या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, दिवसेंदिवस प्रशासनाने दिलेल्या तारखेत वाढ होत असून ब्लॉक वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
 
भुस्खलन, रेल्वे लाईन डॅमेज आणि पाऊस या कारणास्तव रेल्वेच्या मुंबईला जाणाऱ्या व इतर ठिकाणच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यत्वे पावसामुळे दहा दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मागील आठवड्यापासुन मुंबई-पुणे दरम्यान एकही गाडी धावलेली नाही. दोन्ही शहरात दरम्यान धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या मुंबईला जाणाऱ्या काही गाड्या पुणे, दौंड व सोलापूर स्थानकापर्यंत धावत आहेत.