1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (09:31 IST)

मराठा समाजचे आंदोलन स्थगित, पुरग्रस्तांना मदत करणार

The Maratha Samaj movement will halt
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी छेडण्यात येणारे आंदोलन तूर्तास काही काळापुरते स्थगित करण्यात आले आहे. राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती पहाता सर्व लक्ष पुरग्रस्तांच्या मदतकार्यावर केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मराठा क्रांती मोर्चाची पुरग्रस्तांच्या मदत कार्याविषयी नियोजन बैठक पार पडली. महाराष्ट्रावर ओढवलेल्या अस्मानी संकटाशी सर्व शक्तीनिशी सामना करण्याचा मराठा क्रांती मोर्चा तर्फे ठरले.
 
मुंबई व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून जनतेकडून येणाऱ्या मदती करीता ठिकठिकाणी मदतकेंद्रे उभारली जातील.मराठा क्रांती मोर्चा,महामुंबई मार्फत स्वच्छतेच्या उपकरणांचा व इतर साधनांच्या मदतीचा पहिला ट्रक येत्या दोन दिवसात पाठवण्याचा संकल्प केला. आपत्ती ग्रस्त जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी मदत लागणार असल्याने त्यांच्या गरजेनुसार मदत पुरावण्याबाबत नियोजनबद्ध कार्यक्रमांतर्गत मदतकार्य करावे असे ठरले.