शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (21:32 IST)

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस

supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, त्याची माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आज येथे पत्रकार परिषदेत सुळे यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, संसदेच्या अधिवेशनात मी केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठविला. तीन वेळा मी संसदेत भाषण केले. ही भाषणे आणि त्यातील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आणि केंद्र सरकारला अडचणीत आणणारे होते. त्यामुळेच केंद्र सरकारला ही बाब झोंबली. ज्या दिवशी मी तिसरे भाषण केले त्याच दिवशी सायंकाळी माझ्या पतीला आयकर विभागाची नोटीस आल्याचे सुळे यांनी सांगितले आहे.
 
आयकर विभागाच्या नोटीशीबाबत मात्र, त्यांनी फारशी माहिती दिलेली नाही. कुठल्या प्रकरणात आणि कशा स्वरुपाची ही नोटीस आहे हे त्यामुळे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत टीका केली होती की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केंद्रीय तपास यंत्रणेची नोटीस येते मग ती सुप्रिया सुळे यांना का येत नाही? आणि आता यासंदर्भात सुळे यांनीच आयकर विभागाच्या नोटीशीची माहिती दिली आहे.