1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (15:55 IST)

जगभरातील 60 हजार व्यक्तींचा दुर्मिळ खजाना यवतमाळ जिल्ह्याच्या असलम खान सर यांच्या कडे, बीबीसी कडे नाही असा दुर्मिळ खजाना

Rare treasure of 60
यवतमाळ जिल्ह्याचा दिग्रस तालुक्यातील तांदळी या गावचे जिल्हा परिषद शाळेचे माजी शिक्षक असलम खान यांच्याकडे साधारण जगभरातील 60000 व्यक्तींच्या रेडिओवरून आणि आकाशवाणीवरून जे कार्यक्रम प्रसिद्ध झाले त्या कार्यक्रमाचे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांनी करून ठेवली आहे. हा अनमोल खजाना त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून हा रेकॉर्ड करून ठेवला आहे आज अनमोल खजाना आजही त्याच खणखणीत आवाजात सुस्थितीत आढळून येतो.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक महान व्यक्तीचे त्यांच्याकडे व्हाईस रेकॉर्डिंग आहे .
देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे ही भाषणाचे ध्वनिफीत हरीवंश राय बच्चन यांची कविता आजही असलम चाचा यांच्याकडे सुस्थितीत आहेत .

सण 1992 पासून त्यांच्या या छंदाची सुरुवात झाली सुरवातीला बीबीसी वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग त्यानी केली आणि आज जगभरातील 60 हजार व्यक्तींचे रेडिओ वरून प्रसारित कार्यक्रम त्यांनी रेकॉर्डिंग करून त्यांचा संग्रह केला.