आता ते मी काढलेले फोटोही चोरत आहेत. त्यांना फोटो काढण्याची पण अक्कल नाही-- उद्धव ठाकरे
विधिमंडळात खडाजंगी सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे. शिंदे गट मागील काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंना चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते मी काढलेले फोटोही चोरत आहेत. त्यांना फोटो काढण्याची पण अक्कल नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली आहे. नागपुरात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं.
शिवसैनिकांना संबोधित करताना शिंदे गटाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांची स्वत: काही कमवण्याची लायकी नसते, ते सगळं काही चोरतात. ते शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले, आता ते पलीकडे गेले आहेत. जाताना त्यांनी माझे वडील, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चोरण्याचा प्रयत्न केला. पण ते माझी हिंमत चोरू शकत नाही. हिंमत अंगात असावी लागते. त्यांनी काय केलंय? हे त्यांना आता कळणार नाही. पण ते जेव्हा सामन्याला समोर येतील, तेव्हा मी त्यांना दाखवून देईन…”
Edited By -Ratnadeep Ranshoor