मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2019 (09:13 IST)

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही : मुख्यमंत्री

OBC reservation is not shocked: Chief Minister
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कोर्टाने दिलेल्या निकालातले मुद्देही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी कोर्टाचा निर्णय जाहीर करताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या. मराठा बांधवांनी जो लढा दिला त्याचं हे यश आहे. तसंच मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिला त्या अहवालाने सर्वात महत्त्वाची भूमिका या सगळ्या प्रक्रियेत पार पडली असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.  जो कायदा विधीमंडळाने तयार केला होता तो वैध ठरवण्यात आला याचा मला आनंद वाटतो आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांनी दिलेली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.