शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (08:13 IST)

रश्मी ठाकरे यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एकाला अटक

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो वडगाव शिंदे, हवेली येथील असून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून, त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या 7 मेरोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. घटनात्मक पदावर असलेल्या आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशी कृती केल्या मुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे हा भाजपचा कार्यकर्ता असून त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे.