संबंधित माहिती
- फडणवीस सरकारने दिलेले वकीलच आपण दिले; रोहित पवारांचाही भाजपवर निशाणा
- भाजप मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने खेळतेय - नवाब मलिक
- भाजप कार्यकर्त्यांचे बुधवारी पश्चिम बंगालातील हिंसाचार निषेधार्थ आंदोलन -चंद्रकांत पाटील
- “पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात”, भाजपाची प्रतिक्रिया
- निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता-ममता बॅनर्जी
भाजपकडून संजय काकडे यांची ‘या’ पदावर नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी खासदार संजय काकडे यांची आता प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांना दिलं आहे.
आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन माजी खासदार काकडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. गतवेळी मनपा निवडणूकीत भाजपला मोठ यश मिळालं होतं. त्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यांनी मनपामध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते.
राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार काकडे यांनी केलेले कार्य तसेच संसदेत काकडे यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिनंदनीय असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
काकडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटना वाढविण्यासाठी निश्चितपणे होईल, असं देखील भाजपानं म्हटलं आहे.
