गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (22:52 IST)

भाजप कार्यकर्त्यांचे बुधवारी पश्चिम बंगालातील हिंसाचार निषेधार्थ आंदोलन -चंद्रकांत पाटील

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर (टीएमसी)तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त केलेल्या हिंसाचारातून भाजपच्या कार्यकर्त्याला ठार मारून त्याचा घराची जाळपोळ करून त्याचा दुकानाला जाळणे असे प्रकार घडले आहे त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते उद्या बुधवारी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करणार आहे,अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 
ते म्हणाले की पश्चिमबंगाल मध्ये निवडणुकीच्या निकाल लागल्यावर त्या राज्यात सर्वत्र सूड घेण्याचे राजकारण सुरु आहे.तृणमूळचे कार्यकर्ते ठिकठिकाणी हल्ले करत आहे. खरं तर ही लोकशाहीची हत्या आहे.

भाजपच्या कार्यकर्त्याचा खून करून त्याचा घराला जाळून त्याचा व्यवसायाच्या ठिकाणी जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यात शांततेत निदर्शने करतील हे निदर्शने कोरोना प्रोटोकॉल चे पालन करून नियमांना पाळून हे आंदोलन केले जाईल असे त्यांनी सांगितले. त्यांनी लोकशाहीवर आस्था ठेवणाऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील दिले आहे.