गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (19:58 IST)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पॉजिटीव्ह रेट बद्दल दिलासायक बातमी दिली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या बातमी मध्ये एक दिलासादायक बातमी येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 36 जिल्ह्या पैकी 12 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली आहे. जरी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली असली तरी बाकीच्या जिल्ह्यात अजून कोरोना बाधित सक्रिय रुग्ण आहे. त्यांच्यावर योग्य उपचार देऊन त्यांना कोरोना मुक्त करणे हेच आपले लक्ष्य आहे. 
हे सर्व मोठ्या प्रमाणात चाचण्या होत आहे त्यामुळे झाले आहे.असे ही ते म्हणाले चाचण्याचे प्रमाण कुठे ही कमी न झाल्यामुळे पॉझिटिव्ह रेटमध्ये  5 टक्यांची घट झाल्याचे  निर्देशनासआले आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ते म्हणाले की राज्यात दिवसाला सुमारे 2.5 लाख ते 2.8 लाख कोरोनाच्या चाचण्या होत आहे. या मध्ये आरटीपीसीआर आणि अँटीजन चाचण्या घेण्यात येत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 84.7 टक्के झाला आहे. हा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेट पेक्षा जास्त आहे.         
रेमडेसिवीर पुरवठा अधिक व्हावा या साठी देखील प्रयत्न केले जात आहे. तरीही रेमडेसिवीरची इंजेक्शन मिळत नाही ह्याची खंत आहे असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.