शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (16:36 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसनं 'या' बातमीवर केला खुलासा

पंढरपूर निवडणुकीच्या निकालात भाजपाचे समाधान आवताडेयांनी बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव झाला. यानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यालीगल सेलने ही पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारं पत्र फिरू लागलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या बातमीवर खुलासा केला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, अँड नितीन माने या नावाचा व्यक्ती स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य असल्याचं भासवत असून त्याचे लेटर हेडदेखील बनविले आहे. त्या लेटरहेडचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलच्या नावाचा गैरवापर करून विविध निवेदन आणि तक्रारी देत आहे. मात्र अँड. नितीन माने, मुंबई याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलशी काहीही संबंध नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.