संबंधित माहिती
- “… तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं
- ‘लस महोत्सव नक्की करू पण…’ आधी लस तर द्या- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
- महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते - जयंत पाटील
- वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही- केंद्राने महाराष्ट्राला सांगितलं
- प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, फडणीस यांचा मुख्यमंत्र्यांना प्रतिटोला
म्हणून थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले
राज्यात येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. ही मोहिम सुरू होण्याआधीच त्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात ही लस सर्वांना मोफत दिली जाईल, अशी घोषणा राष्ट्रनादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. याचा मोठा गाजावाजा झाल्यानंतर मलिक यांनी घुमजाव केले. आता याप्रकरणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याप्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.
मोफत लसीकरणाच्या घोषणा काही जण श्रेय घेण्यासाठी करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील जो निर्णय असेल तो मुख्यमंत्र्यांनी जाहिर करावा, असे थोरात म्हणाले. मोत लस देण्याबाबत आम्ही आग्रही आहोत. त्याविषयी आमची चर्चा झाली आहे. पण, श्रेयवादासाठी माहिती देणे वा घोषणा करणे योग्य नाही, असे थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले आहे. ज्या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. त्याची घोषणा करणे योग्य नाही. येत्या १-२ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबतीत माहिती देतील, असेही थोरात यांनी सांगितले.
