मुलाकडून आईचा छळ, कोर्टाने मुलाला दिला दणका
पुण्यातील एका ७४ वर्षीय वयोवृद्ध आईचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या मुलाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांच्या कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. या महिलेचा मुगला आणि त्याची पत्नी आईच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचा छळ करत होते. आईचा फ्लॅट बळकवण्याचा त्यांचा कट होतो. मात्र वयोवृद्ध आईने याबाबत त्यांच्या विरोधात आईने कोर्टात दावा देखील केला होता. याबाबत कोर्टाने मुलाला दरमहा आईला दहा हजार देऊ करण्याचे सांगितले असून आईच्या फ्लॅटमध्ये येण्यास बंदी देखील केली आहे.
पिडीत महिलेला दोन विवाहित मुले आणि एक मुलगी आहे. तर या महिलेच्या पतीने निधन झाले. त्यानंतर ही महिला त्या फ्लॅटमध्ये एकटी राहत आहे. तर या महिलेचा मोठा मुलगा आपल्या कुटुंबासोबत वेगळा राहत होता. तर लहान मुलगा त्याची पत्नी आणि दोन मुले या महिलेच्या घरात बळजबरीने राहत होती. त्यामुळे वयोवृद्ध आईचा मुलगा आणि सून यांच्याकडून त्यांचा सतत छळ होत होता. आईला जेवायला न देणे, गॅस सिलिंडरचे बटण चालू ठेवणे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, घाणेरड्या शिव्या देणे सुरु होते. या सर्व त्रासाला कंटाळून आईने वेळोवेळी आपल्या मुलाच्या आणि सूनेच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती.