ब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर निशाना
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे काही केलं आहे की ज्यामुळे जगातील मीडियाचे लक्ष त्यांच्या कडे वेधले गेले आहे. पुतिन यांनी कॅलाशॅनिकोव्ह रायफल्स वापरली आहे. त्यांनी जवळपास तब्बल 1968 फुटांवरील लक्ष्यावर अचुक निशाणा साधत सर्वाना धक्का दिला आहे. पुतिन यांच्या अचुक लक्ष्यभेदाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. रशियाची राजधानी मॉस्को येथील पेट्रिएट पार्कच्या शूटिंग रेंजमध्ये हत्यांरांचे प्रदर्शन भरले आहे. प्रदर्शनाला पुतिन यांनी हजेरी लावत प्रदर्शनात ठेवण्यात आलेली स्नायपर रायफल्स एसव्हीसीएच – 308 स्वत: चालवून पाहिली आहे. यावेळी पुतीन त्यांच्या राष्ट्रपतीच्या सुटात होते. पुतिन यांनी पाच पैकी चार वेळा अचुक लक्ष्यभेद केला आहे. ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट रायफल्स ही जगप्रसिद्ध कॅलाशॅनिकोव्ह रायफल्सचे नवीन मॉडेल आहे.