1 ऑगस्टला आदित्य ठाकरे कोल्हापुर दौऱ्यावर
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदार आणि दोन खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापुरात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच महाराष्ट्रभर शिवसेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे दौरा करत आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. . मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्टला संध्याकाळी येणार असल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली. आज कोल्हापुरात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निष्ठा रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.