शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2022 (14:45 IST)

काँग्रेस इलेक्शन मोडवर, थोरांतांवर दिली मोठी जबाबदारी

निवडणुका आल्यावर ऐनवेळी धावपळ आणि जमवाजमव करण्याऐवजी काँग्रेसने यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्था समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
या समितीचे प्रमुख म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर समन्वयक म्हणून पुण्याचे मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात नेहमीच विविध स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरू असतात.
 
त्यामुळे निवडणुकीशी निगडीत बाबींचे सातत्याने अवलोकन होत रहावे, त्यावर समिक्षा होत रहावी तसेच पूर्व तयारी योग्य वेळी व्हावी यासाठी निवडणूक व्यवस्था समिती कार्य करणार असल्याचे काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अशी आहे समिती : बाळासाहेब थोरात (समिती प्रमुख), मोहन जोशी (समन्वयक). तर समितीचे सदस्या पुढीलप्रमाणे अमित देशमुख, सुनिल केदार, अस्लम शेख, सुरेश वरपूडकर, संग्राम थोपटे, सुभाष धोटे, डॉ. उल्हास पाटील, विकास ठाकरे, विरेंद्र जगताप.