शिवजयंती निमित्त शोभायात्रा, आमदारांसह 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

Last Modified शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (13:29 IST)
अकोला- शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं सरकारचं आवाहन धाब्यावर बसवत अकोला जिल्ह्यातील अकोट याठिकाणी शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली.


याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर कुटासा गावामध्ये शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली त्यामुळे घडलेल्या प्रकारावर कारवाई करण्यात आली.

कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करावी, अशी सूचना राज्य सरकारद्वारे देण्यात आली होती. त्यासाठी ठाकरे सरकारतर्फे नियामावली देखील जाहीर करण्यात आल्या असताना हा प्रकार घडला. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाईक रॅली, प्रभात फेरी, पोवाडे वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला बंदी घालण्यात आली होती.
जास्तीत जास्त 10 लोकांच्या उपस्थितीत मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच शिवजयंती साजरी करायला परवानगी होती. केवळ शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळ्यासाठी 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना, 30 जूनला फ्लोर टेस्ट ...

एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना, 30 जूनला फ्लोर टेस्ट होणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे लवकरच मुंबईत परतणार असल्याचं बोललं आहे.मंगळवारी अनेक ...

Maharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह ...

Maharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात पोहोचले, म्हणाले- फ्लोर टेस्टसाठी उद्या मुंबईला जाणार
बंडखोर आमदारांसह कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी आलेले नाथ शिंदे म्हणाले, "मी येथे ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या इतके कसे जवळ ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या इतके कसे जवळ आले?
वर्ष 2014. युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. खाते वाटप झाल्यानंतर शिवसेना आणि ...

दीपक हुड्डाचं शतक, भारताचं आयर्लंडवर निर्भेळ विजय

दीपक हुड्डाचं शतक, भारताचं आयर्लंडवर निर्भेळ विजय
दीपक हुड्डाच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ...

मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं- राज्यपालांकडे ...

मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं- राज्यपालांकडे देवेंद्र फडणवीसांची मागणी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट ...