1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (09:18 IST)

मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला-संजय राऊत

sanjay raut
हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामीनाथ यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भात घोषणा केली आहे. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

मात्र प्रकरणी आता विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करताना पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे, असे म्हटले आहे.
 
संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले की, स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे. पहिल्या वेळेला दोन आणि आता तीन नेत्यांना अवघ्या एका महिन्यात भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र, वीर सावरकर किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, जे भारतरत्नासाठी अधिक पात्र आहेत.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor