रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पनवेल , शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (08:17 IST)

चोर समजून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू, खारघरमधील घटना

चोरी केल्याची बातमी समजताचआपल्या कामगारांच्या मदतीने संशयीत चोराला गाळ्यात आणून त्याला मारहाण केली याच मारहाणीत एकाला प्राण गमवावे लागले. खारघर पोलीसांनी या प्रकरणी तीघांना अटक केली आहे.
खारघर वसाहतीमध्ये दोन दिवसांपूर्वी सेक्टर 12 मधील एका गाळ्यामध्ये लोखंडी वस्तू चोरी झाली होती. या गाळ्याचे मालक आणि त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी संशयीत चोरांचा शोध घेत होते. त्या कर्मचा-यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अनिल जाधव आणि विनोद राठोड या दोन संशयीत चोरांना पकडून गाळ्यात आणले. त्यांना मारहाण केली. याच जबर मारहाणीत  संशयीत चोरापैकी विनोद यांचा मृत्यू झाला.
 
पोलीसांनी माहिती मिळाल्यावर खारघरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांच्या पथकाने सेक्टर 12 येथील ओमशांती निवास हा गाळा गाठला. विनोद राठोड याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पनवेल येथील उपजिल्हा  रु1/2णालयात पाठविले आहे. पोलीसांनी या प्रकरणी तीघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेजवळ यांनी दिली. या प्रकरणी मारहाणीत गाळे मालकाने कामगारांसोबत मारहाणीत मदत केल्याने त्यांना सुद्धा पोलीसांनी अटक केली आहे. संशयीत चोराला पकडून परस्पर शिक्षा दिल्याने सवारनाच पोलीस कोठडीत बसावे लागले आहे.