शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (12:21 IST)

एका तीळाचे 16 मिनिटे 20 सेकंदात केले शंभर तुकडे, ही कमाल केली या कलाकाराने

यवतमाळ - पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या तरुणाने एकाच तिळाचे 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क शंभर तुकडे करण्याचा विक्रम केला आहे. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. संस्थेतर्फे अभिषेक यांना पदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला.
 
अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेजमध्ये बीएफए अंतिम वर्षाला शिकत असून मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचीसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी तिळावर ए.बी.सी.डी यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तसेच 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच, पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुका, कोल्हापूरची देवी साकारली आहे.
 
एक तीळ सात जणांनी वाटून खावा हे वाक्य प्रेरणादायी ठरले आणि अभिषेक ने चक्क तिळाचे 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क शंभर तुकडे करण्याचा विक्रम केला आहे.