1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जून 2024 (13:22 IST)

ठाण्यात इमारतीला धडकून ट्रक पालटून अपघात, एक ठार, 6 जखमी

death
ठाण्यात सिमेंट मिक्स करणारा ट्रक इमारतीला धडकून पालटून अपघात झाला. या अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले. 

सदर अपघात शनिवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास सम्राट नगर येथे घडला. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून तो एका इमारतीला जाऊन धडकला आणि कम्पाउंडची भिंत तोडून  पालटला. या अपघातात एका 14  वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. तर 6 जखमी झाले. 

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुखाने सांगितले सम्राट नगर येथे ही घटना घडली असून अपघातात जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव दिली आणि दलाच्या कर्मचार्यांनी मदत आणि बचाव कार्य केले.  
 
Edited by - Priya Dixit