सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (13:28 IST)

वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, सांगलीतील एक जण ठार

accident
साताऱ्यामध्ये वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका वारकाऱ्याचा मृत्यू झाला तर चार वारकरी जखमी झाले आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
 
तीन दिवसांत साताऱ्याच्या हद्दीत वारकऱ्यांच्या गाडीला झालेला हा दुसरा अपघात असून सर्व वारकरी सांगली जिल्ह्यातील असून सांगलीहून आळंदीला जाताना हा अपघात झाला आहे.
 
पहाटे साताऱ्यातील रायगाव गावच्या हद्दीत ट्रक आला असता ट्रकचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकानं ट्रकचं स्पीड कमी केलं पण तितक्यात ट्रकला मागुन आयशर टेम्पोने धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले आहेत.