गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (06:56 IST)

वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, एकाचा मृत्यू

accident
साताऱ्यात वारकऱ्यांचा गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिली. या अपघात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूर पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती. सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ येथे खडाळा गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. एक भरधाव टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 30 वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
 
अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर ट्रक पलटी झाला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले.