कांद्याने सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी आणले, कांद्याची आवक घटली, कांद्याचे भाव वधारले
राज्यात ठीक ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. सध्या बाजारात साठवून ठेवलेले कांदे बाहेर काढले आहे. नवीन कांद्याला मागणी वाढली आहे. सध्या कांद्याचे भाव 4500 रुपये प्रति क्विंटल चा भाव आहे. सध्या कांद्याची आवक घटल्याने कांदा महाग झाला आहे. कांद्याचे भाव एकाएकी वाढले आहे. काही महिन्यापासून साठवलेला कांदा कांद्याचे भाव घसरल्यामुळे खराब होत असल्याचे आढळून आले आहे.
कांद्यासाठी महत्त्वाचे असणारे चाकण बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव
वधारले असून चाकणच्या घाऊक बाजारात कांद्याला प्रति क्विंटलने 2200 - 3200 भाव मिळाला आहे. किरकोळ कांद्याचे भाव 32 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे कांद्याचे हे दर सामान्य माणसाच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणणारे आहेत.
कांदा काढण्याचा खर्च आणि वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे कांदा दर वाढवावे लागते बाजारात कांदा नेण्यासाठी खर्च होतो.कांद्याला मार्केट मध्ये पावसामुळे लिलाव ची किंमत मिळत म्हणती. कांदा व्यापारी कांद्याच्या दाराची मागणी 2 ते 6 रुपये किलोच्या दराने करतात त्यात आम्हाला काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नाही. असे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.