बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (12:35 IST)

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखीन चिघळणार ;निलंबनाची कारवाई सुरूच

सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार मध्ये विलीनीकरणाच्या मागणीला घेऊन संप पुकारले आहे. राज्यभरात एसटीची सेवा बंद करण्यात आली आहे. या मुळे प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच एसटी महामंडळाला आर्थिक फटका देखील बसत आहे. उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचा आदेश दिला आहे. एसटी संप पुकारल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना निलंबित केले जात आहे. राज्यभरात 16 विभागातील 45 आगरमधील तब्बल 376 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यावर आता रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्यांनावर वज्रपात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 28 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी संतापले असून आक्रमक झाले आहे. हे संप अजून चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसटी कर्मचारी हे उपोषणाच्या ठिकाणी मोर्चाचे घेऊन बसले आहे. अशी माहिती मिळत आहे.